अवैध हातभट्टी दारु वर स्था. गु. शा. भंडारा ची कार्यवाही…

साकोली वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जांभळी/सडक ता. साकोली येथील स्था. गु. शा. कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन बोदरा शेत शिवारात बोदरा नाल्याच्या काठावर आरोपी चन्द्रशेखर तुंबळे याचा ताब्यातुन अवैध हातभट्टी दारु च्या प्लास्टिक पिशव्या मध्ये सडवा मोहफस व इतर साहित्य ज्याची अंदाजे किंमत ६०,०००/- रु. मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम ६५(फ) म. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
#साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कित्येक गावात असे अनेक अवैध धंदे होत आहेत स्था. गु. शा. भंडारा ने जास्त प्रमाणात कार्यवाही करणे अपेक्षित आहे अशी परीसरात चर्चा होत आहे.#
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , स्था. गु. शा. चे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर व साकोली पोलीस स्टेशन चे अधिकारी/कर्मचारी करीत आहेत.
राजेश ऊके (भंडारा जिल्हा अध्यक्ष बहुजन मराठी पत्रकार संघ) यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र परीवाराने वाढदिवस साजरा केला




