सितासावंगी येथील कॅनरा बॅक मध्ये झालेल्या चोरीचा पर्दाफाश…

भंडारा पोलिसांकडून दोन तासात गुन्हेगाराला अटक…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सितासावंगी गावात कॅनरा बॅक मध्ये १ कोटी ५८ लाखाची चोरी झाल्याने परीसरात खलबली मचली ! चोरी च्या घटनेची माहिती पडताच बॅक कर्मचाऱ्यांनी गोबरवाही पोलीस स्टेशन ला जाऊन गुन्हा नोंदवीला त्यावर गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन यांना झालेल्या गांभीर्य घटनेची माहिती दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि स्था. गु. शा. चे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर, गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शेवाळे यांना संपूर्ण स्टापसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.
प्रेस कॉन्फ्रेस घेतांना पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन
बॅक मध्ये बारकाईने तपासणी घेता बॅकेच्या CCTV कॅमेरा मध्ये बॅकेचा च कर्मचारी ह्या घटनेमध्ये स्वलग्न असल्याची खात्री पडताच एक टीम नागपूर येथे संशयीत आरोपी मयुर नेपाले सह. प्रबधंक याच्या निवासस्थानी जाऊन दमदाटी ने विचारपुस केली असता त्याने चोरी केल्याचे कबूली केली.
त्याच्या कडून चोरी केलेले ९६ लाख १२ हजार रुपये, चोरीत वापलेली दुचाकी कि. ८०,००० एक चार चाकी वाहन १० लाख, रेडमी कंपनी चा मोबाईल ५ हजार, व्हिडीआर ४ हजार असा एकुण १ कोटी ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अ



