क्राइम
गौवंश तस्करीवर पोलीसांची कार्यवाही…

पवनी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा निष्ठी येथे आरोपी महिन्द्रा पिक अप मध्ये लहान मोठे ८ गोवंश निर्दयतेने चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंडले आणि १५ जनावरे क्रुरतापणे जवळ बांधून गोवंश चा कत्तल करण्यासाठी कत्तल खान्यात नेत असताना आढळून आल्याने आरोपी च्या ताब्यातुन पिक व जनावरे ज्याची किंमत ६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हने यांच्या मार्गदर्शनात पोउपनी येवले, सफो नागरीकर, पोहवा मेश्राम यांनी केली.



