क्राइम
अवैध रेती वाहतूकीवर पोलीसांची कार्यवाही…

अड्याळ वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा गोसे स्मशानभूमीजवळ गोसे ते चिचाड रस्त्यावर कोणत्याही प्रकारची परवानगी व रॉयल्टी नसतांना अवैध रितीने रेती वाहतूक करतांना आरोपी नितेश उळेमल यांला विचारपुस केली असता सदर रेती कोरंभी नदिपात्रातुन नेत असल्याचे मिळुन आल्याने आरोपी च्या ताब्यातुन सोनालिका कं. चा ट्रक्टर व १ ब्रास रेती याची अंदाजे किंमत ७ लाख ६ हजार रुपयांचा मिळुन आल्याने आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर ची कार्यवाही
#पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अड्याळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार धनंजय पाटील#
यांच्या मार्गदर्शनात पोहवा मारबदे, पोहवा आंबुडारे व अड्याळ पोलीस स्टेशन चे कर्मचारी करीत आहेत.



