भंडारा जिल्हात १३ आरोपी वर एम पीडीए तर ७१ आरोपी तडीपार…

भंडारा जिल्हा क्राईम वार्ता
:-मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्हाचा पदभार सांभाळताच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी, कर्मचारी हे नियमांचे काटेकोर पणे पालन करतात.
तुमसर पोलीस स्टेशन परिसरातील शहर वार्ड येथील रहिवासी कार्तिक राऊत २०२४ पासून अनेक गुन्हेगारीत सक्रीय असुन तुमसर येथे #खुनाचा प्रयत्न, दुखापत, अत्याचार, समाजातील लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे, अंमली पदार्थाचा सेवन करणे असे मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत.अशा प्रकारचे गुन्हेगारास कायद्याच्या कसोटीत बसवुन त्याच्या गुन्हेगारी चा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने समाजाला व आजुबाजूच्या परीसरात अंत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने त्याच्याविरुद्ध तुमसर पोलीस स्टेशन येथे #एम पी डी ए# कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी भंडारा सावनकुमार यांनी स्थानबद्ध ईसमाचा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याचा आदेश पारीत केले.
दुसरे वृतांत असे की जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय करणारे चार आरोपींना तडीपार करण्यात आले यामध्ये कन्नेया फटींग (जांब मोहाळी),दुर्योधन मंडारे रा. लाखांदूर,शिवराम हेमने रा.महालगाव ता.साकोली ,कोमल धकाते रा.सानगळी ता.साकोली ह्या आरोपींना संबंधित ठानेप्रभारी यांनी तपास घेऊन त्यांच्या गुन्हेगारी चा अस्त होण्याकरिता #तडीपार# प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन# यांच्या मार्गदर्शनात तयार करून त्यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी तुमसर/साकोली यांच्या कार्यालयात सादर केले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्था. गु. शा. भंडारा चे पोलीस निरीक्षक चिंचोळकर व संबंधित पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी केली.



