अवैध दारू तस्करीवर कार्यवाही…

साकोली वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन मधील मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा कुभंली येथील आरोपी विलास इंगळे याच्या ताब्यातुन ऑफिसर चॉईस ब्लु, एम सी डोव्हिल, देशी दारू व ईलेक्ट्रॉनिक स्कुटी असी एकुण अंदाजे कि. ९७ हजार ५७५ रुपयांच्या मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम ६५( ई) म.दा.का . नुसार सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला. #दुसरी कार्यवाही डकैत गुन्ह्यातील फरार आरोपी ला अटक#पोलीस स्टेशन साकोली अंतर्गत चोरी झालेल्या घटनेतील फरार आरोपी भारत डिंगबर शहारे हा आरोपी फरार होता ह्या चोरी च्या घटनेतील १ लाख ७९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता फरार आरोपी चा शोध घेण्यासाठी स्था. गु. शा. पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोपी चा सध्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक नागपूर ला रवाना करण्यात आले आणि आरोपी भारत शहारे यास त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे व साकोली पोलीस कर्मचारी व कर्मचारी करीत आहेत.



