क्राइम
अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही…

७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाम्हणी ते सिवणी जाणाऱ्या कच्या रस्त्याच्या शेत शिवारात एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनी चा ट्रक्टर मध्ये अवैध रेती वाहतूक करतांना मिळुन आल्याने आरोपी शुभम काहालकर याच्या ताब्यातुन ट्रक्टर व रेती अंदाजे किंमत ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध सदर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, तुमसर पोलीस चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सपोनि साखरे , पोहवा गावंड पोलीस स्टेशन तुमसर यांनी केली.



