क्राइम
चिखला मॉईल मध्ये झालेल्या चोरी चे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यात केन्द्र सरकार द्वारा मॅग्निज ओर ईन्डीया लि. चिखला तसेच डोंगरी बुजुर्ग ची खाने सुरू आहेत.

चिखला मॉईल मधुन चोरट्यांनी अंदाजे ७४,००० रुपयांचा मालाची चोरी केली त्यामध्ये कॉपर केबल, वजन उचलणारा हंगीग चैन, हॅड्रोलिंक पंप, नटबोल्ट, वाईन्स यंत्र असा अनेक मालाचा समावेश चोरीच्या सामानात आहे. ह्या झालेल्या चोरीमध्ये गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद गिरी साहेब यांनी आपली कर्तव्यदक्ष कामगिरी दाखवून चोरीचे आरोपी १) राहुल अरुण झोळे २) यशवंत रामचंद सोनवणे ३) समीर जमिर शेख हे तिघेही आरोपी रा. चिखला गावातील असुन त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्दे माल एकुण ७४,०००/-जप्त करण्यात आला व आरोपीला . अप. क्रं१३/२०२४ भा. द. वि अन्वे. कलम ४५४,४५७,३८० गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी साहेब व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करित आहेत.




