राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजीत पवार गुट) तर्फे बुथ कमेटी ची आढावा बैठक
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावातील शासकीय विश्रामगृहात आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राची बुथ कमेटी ची आढावा बैठक माजी जिल्हा परिषद भंडारा चे सभापती तसेच तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजीत पवार गुट) चे धनेन्द्रजी तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुथ कमेटी च्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

श्रीयुत धनेन्द्रजी तुरकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कार्य केले जसे अदाणी, सोंड्या प्रकल्प, गोसीखुर्द प्रकल्प तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली. असे त्यांच्या केलेल्या कार्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे हि काळाची गरज आहे.

ह्या आढावा बैठकीत प्रामुख्याने डॉ. सचीन बावनकर सर्कल प्रमुख , सुमीत गौपाले, सरपंच, कपील जैन, हरीराम गौपाले, गोल्डी घडले, युवराज सोनटक्के, डिंगबर काशिवार, मानिकलाल नांदगाये, भाऊलाल झोळे, अमोल गौपाले, मुन्ना नागपुरे, दिलीप घडले, प्रकाश बागडे, वालीक राऊत, रुपेश परतेती, दिलीप देशमुख, विजय ईनवाते, गुलशन नोनकर, सिद्दिकी, विलास गौपाले, चेतन झोळे, मोरेश्वर गौपाले, लेकचंद देशमुख, प्रकाश मेश्राम, अविनाश राऊत, विजय राऊत असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
