राजकीय
माणीकलालजी नांदगाये यांची सेवा निवृत्त शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ता:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार श्री.प्रफुल्लभाई पटेल यांच्या सुचनेनुसार भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मान.श्री.नाना पंचबुधे, राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेन्द्रजी जैन,माजी खासदार मधुकरजी कुकडे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, प्रदेश सचिव श्री.धनंजयजी दलाल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनीलजी फुंडे, तुमसर तालुका अध्यक्ष धनेन्द्र तुरकर यांच्या नेतृत्वाखाली मानिकलालजी नांदगाये यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर तालुका चे *सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
त्यांच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आष्टी जिल्हा परिषद प्रमुख डॉ.सचिन बावनकर, कपील जैन,सुमीत गौपाले (सरपंच),गोल्डी घडले,शालीक गौपाले, राजेश ऊके (पत्रकार), सुरेश गोखले यांनी अभिनंदन केले.
