जिल्हा
भंडारा विभागीय कार्यालयातील सहाही आगार नफ्यात…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा विभागीय सांख्येकी अधिकारी भंडारा विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार माहे.सप्टेम्बर २०२३चा नफा-तोटा अहवाल केला.अहवालाप्रमाने सप्टेंबर २०२३मध्ये सहाही आगारांना नफा मिळाला आहे.यामध्ये भंडारा आगार ७.०७लाख, गोंदिया ७१.४०लाख , साकोली ८८.२५लाख,तिरोडा ५लाख ,तुमसर ७२.१३लाख तर पवनी १३.१३लाखाने नफ्यात असुन भंडारा विभागाने एकुण २कोटी ५७लाख ३८हजार रुपयांचा नफा सप्टेंबर २०२३ला मिळविला आहे.

महिला सन्मान योजना व जेष्ठ नागरिकाकरिता अमृत योजना व दिव्यांग, एसटी महामंडळाकरिता फार महत्त्वाची बाब ठरत असुन प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

दिवाळी हंगामाकरिता एकुण बसेसच्या संख्येत वाढ करण्याचे भंडारा विभागीय कार्यालयाचे नियोजन असुन अजुन नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.



