राजकीय

स्वतंत्र मजदूर युनियन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रित करून समस्या सोडवा – शामराव नागदेवे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या पत्रानुसार बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या चे निवारण करण्यात यावे याबाबतचे निवेदन स्वतंत्र मजदूर युनियनचे भंडारा जिल्हाध्यक्ष श्यामराव नागदेवे यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी भंडार यांना केलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,भंडारा जिल्हा परिषदेतील सेवाविषयक कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण संबंधी स्वतंत्र मजदर युनियन यांची सभा ९ एप्रिल 2023 ला आयोजित करून भंडारा जिल्हा समितीचे गठन करण्यात आले होते.

त्यानुसार भंडारा जिल्हा परिषदेतील जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र मजदूर युनियन च्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावून समस्याचे निवारण करावे याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी भंडारा , मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद भंडारा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत भंडारा ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि )जिल्हा परिषद भंडारा ,यांना माहिती करता देण्यात आलेले आहेत. करिता वरील निवेदनाची दखल घेऊन स्वतंत्र मजदूर युनियन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलविण्यात यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button