वन विभागाची -१०९वर्षीय जुनाट धोकादायक इमारतीला डिमॉलिश करण्याची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी वन परिक्षेत्रकार्यालय हे वन विभाग नागपूर चे सर्वात जुने वनपरिक्षेत्र कार्यालय आहे.गत वैभवप्राप्त कोंढाळी वन परिक्षेत्रांचे मुख्य कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकार्यांचे कार्यालयासह वन विभागाचे कर्मचार्यांचे निवास ही जवळ जवळ १०९वर्ष जुने आहे.तेअति जिर्ण झाले आहे. प्रशासकिय कामात उपयोगात आणल्या जाणार्या येथील अति जिर्ण इमारतीं ऐवजी
नवीन इमारतीतून कारभार सुरू असले तरी अधिकारी व कर्मचारी जुनाट इमारतीतच तात्पुरती डागडुजी करुन वास्तव्यास आहे.
खरे तर कोंढाळी वन परिक्षेत्र आवारातील १०९वर्षिय जुनाट कालबाह्य कार्यालय व कर्मचारी निवासांंना डिमॉलिश करून नव्या इमारती बांधून गतवैभव प्राप्त कोंढाळी वन परिक्षेत्र कार्यालयाकरिता अधिकार व कर्मचार्यांसह प्रशासकिय कामाकरीता नवीन इमारतींचे बांधकाम करणे व १०९वर्ष जुनाट कालबाह्य इमारतींना डिमॉलिश करण्याची मागणी कोंढाळी क्षेत्र सुधार समिती चे पदाधिकारी दुर्गाप्रसाद पांडे, प्रविण गोडबोले, ब्रजेश तिवारी, राजाराम खामकर,अंसार बेग, बबलूभिसे,अफसर हूसेन,सह कोंढाळी सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास ज्येष्ठ सदस्य संजय राऊत कमलेश गुप्ता, रामदास मरकाम, राहूल डोंगरे,राजू किनेकर तसेच अनेक सामाजिक संघटणाचे पदाधिकार्यांनी केली आहे.

