कृषी
अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावेत
– संगीता माने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
भंडारा दि. 29 मे :-जिल्ह्यात खरीप हंगामास सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अनाधिकृत बियाणे व खत विक्रेते गावो-गावी फिरुन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची अमिष दाखवून, बियाणे व खते विक्री करु शकतात.

तरी सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे अनाधिकृत बियाणे व खते विक्रेते गावात बियाणे व खते विक्री करत असल्यास याबाबतची माहिती संबंधीत तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करुन कळवावे. तसेच बियाणे व खते खरेदी करते वेळेस अधिकृत परवानाधारक यांच्याकडून पक्की पावती घेऊनच खरेदी करावी.

