ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ची तानाशाही
ग्रामपंचायत सदस्य चा आरोप
तुमसर वार्ता (पंचायत विभाग) :-डोंगरी बुजुर्ग हा गाव बहुचर्चित डोंगरी बुजुर्ग मॉईल म्हणून गणला जातो. परंतु ह्या गावातील सरपंच व उपसरपंच हे तानाशाही ने गावात काम करीत आहेत असा सनसनीत आरोप वर्तमान ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत सदस्य चेतनलाल मिरचुले यांनी केला आहे.
डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायत मध्ये वर्तमान सरपंच व उपसरपंच द्वारा वार्ड नंबर ३ मध्ये सुनील वाटकर यांच्या घरापासून रेखाबाई सोनवाने यांच्या घरापर्यंत नाली उपसा केला होता त्याचा घरासमोरील गंदा मलबा तिन आठवडे पूर्ण होऊनही आतापर्यंत साफ केला नाही व दुसरीकडे काम सुरु केला त्यामुळे गावात डासांच्या प्रादुर्भाव वाढु शकतो व नागरिकांना डेंग्यू मलेरिया, ताप ज्वर सारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.

नागरिकांच्या आजारात वाढ झाली तर संपूर्ण जवाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील अशा माहिती वर्तमान ग्रामपंचायत सदस्य चेतनलाल मिरचुले व तेथील ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.
नाली चा मलबा न उचलण्याचे रेखाबाई सोनवाने यांचा हातठेल्यावरील भाजीपाल्याचा धंदा तिन आठवड्यापासून बंद असल्याची माहिती पोलीस कि आवाज न्युज ला मिळाली आहे.
असे प्रकरण पुढे आल्यावरही डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायत प्रशानणला जाग येणार की नाही ❓असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेत आहे!
बातमी प्रकाशित होताच डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायत प्रशासन कोणती कार्यवाही करते ह्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष केंद्रित आहे.