तुमसर शहरातील सट्टा व्यवसायावर धाड
डीवायएसपी तुमसर यांची कार्यवाही.
तुमसर वार्ता:-तुमसर शहर व तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध धंदे खूप फोफावले आहेत.
ह्या अवैध धंद्यावर तुमसर पोलीस स्टेशन ने विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्याची गरज आहे.
अशाच एक सट्टा व्यवसायावर 27 में रोजी गांधी नगर,सारंगा टॉकीज जवळील परिसरात सट्टा व्यवसाय सुरु असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपने सा. यांना मिळाली असता त्वरित कारवाई चे आदेश उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांना दिले. उपनिरीक्षक यांनी टीम तयार करुन पोलीस शिपाई भोंडेकर, पोलीस हवालदार रवि आडे, उमेश सार्वे पवन कनेरकर, गजानन ठाकरे व महिला पोलीस शिपाई सुनीता ढबाले यांनी २७ में रोजी दुपारी ४ वाजे. दरम्यान गांधी नगर येथील लोकेश गभने यांच्या अड्यावर धाड टाकली. यावेळी लोकेश गभने, नंदकिशोर आणि प्रणय हे तिन्ही सट्टा पट्टीचे आकडे लिहितांना आढळून आले त्यांना सट्टा पट्टी साहित्य, आयफोन, अन्य मोबाईल फोन व वेगवेगळ्या साहित्य सह २,४१,९००/- रुपयांचा माल जप्त करुन आरोपींना महा. जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी अशा मोठमोठ्या अवैध धंद्यावर कार्यवाही करतात परंतु आताही तुमसर शहर व तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध धंद्यांना उत आलेला आहे.
मग ह्या अवैध धंद्यावर अंकुश लागेल काय❓असे परिसरातील नागरिक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे प्रश्न विचारु लागले आहेत.
प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी कोणते ठोस पाऊल उचलतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



