तुमसर सिहोरा बायपास रस्यांवर मार्गदर्शन फलक लावा:-मनसे शहर अध्यक्ष निखिल कटारे
तुमसर वार्ता:- तुमसर मधील नवीन बायपास रोड अपुरा मार्गदर्शक फलक या कारणांमुळे भविष्यात जीवघेणा ठरू शकतो.शहरात अवजड वाहतूक, मुळे बरेचसे दुर्घटना घडल्या आहेत.यामुळे शहरामध्ये नवीन बायपास रोड तुमसर सिहोरा रोड ते तुमसर नाकाडोंगरी रोड असा बायपास मार्ग काढण्यात आला आहे यासाठी शासनाचे आभारच मानल्या पाहिजे पण त्या मार्गावरती अपुरा मार्गदर्शक फलक आहेत् यामुळे भविष्यात अनेक दुर्घटना घडू शकतात कारण हा मार्ग नवीन आहे आणि कुणाला तुमसर ते सिहोरा किव्हा तुमसर ते मेहगाव या मार्गावरून जाण्यासाठी मार्गाच्या मधामध्येच हा बायपास रोड आहे तिथ दर्शनी भागावरती फलक नसल्यामुळे काही आकर्षक ठिकाण नसल्यामुळे वाहन वेगाने ये -जा करत असतात नवीन बायपास फाटा असल्यामुळे अचानक चार चाकी व दुचाकी वाहनांना कंट्रोल करायला अतिशय तारेवरची कसरत करावी लागत आहे.नवीन माणसाला सुद्धा या मार्गाची कल्पना नसते.जे वर्षानुवर्ष बाहेर राहतात शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी इथले नागरिक बाहेर जातात मग काही कामानिमित्त किंवा सुट्ट्यामध्ये आपल्या शहराला परततात तर त्यांना या मार्गाची तमा नसते.योग्य दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालक गोंधळून जातात आणि अपघाताला बळी पडू शकतात.यामुळे भविष्यात अनेक दुर्घटना घडू शकतात आणि काहीजण गंभीर जखमी होऊ शकतात. यावर उपाय.योग्य दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे, जेणेकरून वाहनचालक योग्य मार्गाने जाऊ शकतील.नवीन बायपास रोड जीवघेणा ठरत आहे आणि या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज कार्यकारी अभियंता उप अभियंता महाजन साहेब यांना निवेदन देण्यात आले.आणि त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करतो अशी हमी दिली.यावेळी मनसे.शहर अध्यक्ष निखील कटारे उप शहर अध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर शहर संघटक अश्विन देशमुख विभाग अध्यक्ष विवेक डहरवाल इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



