क्राइम
जिल्ह्यात 37 कलम लागू
भंडारा, दि. 23 : दि.28 मे, रोजी स्वा,सावरकर जन्मदिवस, दिनांक 29 मे, रोजी महाराणा प्रताप जयंती, तिथीप्रमाणे दिनांक 31 मे, रोजी अहिल्याबाई होळकर जयंती, दिनांक 7 जून,रोजी बकरी ईद चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे पुढे तसेच सभाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे दिनांक 10 जून,रोजी वटपोर्णीमा हा सण साजरा करण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 28 मे, च्या 001 वाजतापासून ते दिनांक 11 जून,2025 च्या 24.00 वाजतापर्यत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे.
या अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.




