क्राइम
सहकारी भात गिरणी मध्ये साहित्याची चोरी
आरोपी सिहोरा पोलीसांच्या जाळ्यात…
तुमसर वार्ता:-मिळालेल्या माहितीनुसार मागिल दोन ते तिन महिन्यापुर्वी च्या कालावधीत सहकारी भात गिरणी सिहोरा येथील काही सामान चोरी गेले होते चोरी ची तक्रार सहकारी भात गिरणी चे मॅनेजर तिलकचंद बिसेन यांच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
अखेर चोरीचे आरोपी गणेश ईडपाते, अजय घोडीचोर रा. सिहोरा यांना ताब्यात विचारले असता त्यांनी बंद असलेल्या सहकारी भात गिरणी मधुन इलेक्ट्रीक काटा व ईतर साहित्य असा ५२,०००/- रु. माल चोरी केल्याचे कबूल केले.
सिहोरा पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले.
सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. मनोज ईडपाते, तिलकचंद चौधरी, पोलीस सिपाई गजानन तिरकाळे, बिरकुमार राऊत, मनोज कहनावत, निलेश गजाम यांनी कार्यवाही केली.



