पसार झालेला ट्रक चालक पोलीसांच्या ताब्यात.
वाहतूक नियंत्रण पोलीसांच्या कार्यप्रणाली वर पश्न चिन्ह ❓
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील अपघाती मृतक प्रविण खवास तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टुमनी नाल्याजवळ ट्रकच्या धडकेत मृत्यू पावले.
पसार झालेल्या ट्रकला नाकाबंदी करुन आरोपी रवींद्र रामटेके याला वाहनासोबत अटक केली.
मृतक प्रविण खवास हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य असल्याची माहिती प्राप्त झाली.
भाजपाच्या वतीने वरिष्ठ नेते पिडीत कुटुंबासोबत न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन ला गेले असतांना शहरातील वाढत्या अपघाताच्या घटना तसेच वाहतूक शाखेच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह ⁉, निस्पक्ष चौकशी बाबत प्रश्न उपस्थित केला.
भाजपाच्या वतीने न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा ईशारा दिला.
कुटुंबातील व नागरिकांमध्ये अपघातानंतर तीव्र असंतोष पसरला होता.

पुढे वरीष्ठ पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रण उपशाखा तुमसर यांच्या कार्यप्रणाली बदलविण्यासाठी कोणती उपाययोजना करताना ह्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.



