एकलारी व वरठी गाव परिसरात सनफ्याॅग स्टील व आर्यन कंपनी मुळे सामान्य जनजिवनावर धुरेचा प्रादुर्भाव

प्रदुषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही करण्याची आवश्यकता
विशेष प्रतिनिधी-
भंडारा जिल्ह्यातील वरठी आणि एकलारी या गावांमध्ये स्थित Sunflag Iron & Steel Company Limited मुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत असून ग्रामस्थ प्रचंड संतप्त आहेत. कंपनीच्या धुरंडी व प्रक्रियेतील उत्सर्जनामुळे प्रचंड प्रमाणात काळसर धूळ व धूर गावांमध्ये पसरत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार आणि सततच्या खोकल्याचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे धूर नियंत्रण यंत्र सुरळीत काम करत नाहीत. त्यामुळे धुरांमध्ये हवेचे प्रदूषण नियंत्रणापलीकडे गेले आहे. या प्रदूषणावर ग्रामपंचायत वरठी तसेच स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही, हे विशेष लक्षवेधी आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.