कृषी
युरिया खताची बोरी 266 रुपयांत पण शेतकऱ्यांना मिळतोय 350 रुपयामध्ये…
शेतकऱ्यांमध्ये संताप
तुमसर वार्ता;-तुमसर तहसील मधील नाकाडोंगरी गावात दि. सहकारी राईस मिल सोसायटी नाकाडोंगरी येथे युरीया खताची बोरी शासकीय किंमत 266 रु. असुन ईथे 360 रुपयाला दिली जाते त्यामुळे परीसरातील शेतकरी वर्गात भारी आक्रोश निर्माण झाला आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी ह्या काळाबाजारी जिल्हा कृषी अधीक्षक भंडारा यांच्या कडे तक्रार करुनही आतापर्यंत काहीच कार्यवाही झाली नाही असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे प्रतिनिधी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या सोबत दुरध्वनी वर बोलनी केली असता त्या चौकशी करतो म्हणाल्या.
खाजगी कृषी केन्द्र सुध्दा युरीया खताची ची बोरी 400 रुपयांपर्यंत विक्री करतात असी माहिती मिळाली आहे.
परीसरातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे मांग केली की शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
