क्राइम
जुगार अड्यावर पोलीसांची धाड…
७ आरोपींना अटक…
सिहोरा वार्ता:-तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परसवाडा येथे जुगार♦♣♥♠ अड्यावर सापळा रचुन छापा मारला यात सिहोरा पोलीसांनी ७ आरोपींना अटक करुन 35 , 000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार खेळतांना मिळालेले लोकेश आमकर, रतन गौपाले, मनोज मारबते, उमाशंकर ढबाले, शामलाल शेंडे, कमलेश महले, राधेश्याम येळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून 1,460 रु. नगदी, 1 मोबाईल, 1टी.व्ही.एस.दुचाकी , असा एकुण 35,010, रुपयांचा माल जप्त करण्यात आला व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस Stretch निलेश मोरे व पोलीस निरीक्षक विजय कसोधन

यांच्या मार्गदर्शनात पोहवा लोकेश डुभरे, मनोज ईडपाते, साठवने हे सर्व पोलीस कर्मचारी करीत आहेत.



