क्राइम
अवैध जुगार अड्यावर पोलीसांची धाड…
1,34,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
करडी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुप्त माहिती च्या आधारे मौजा पांजरा येथे शेत शिवारात सार्वजनिक खुल्या जागेवर बावन तास पत्ती जुगार♦♣♥♠ वर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना करडी पोलीसांनी जुगार♦♣♥♠ अड्यावर धाड मारली त्यामध्ये आरोपी कडून 1 लाख 34 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल साहित्यासहीत मिळुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कार्यवाही

पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व करडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार गौरख नागलोत
यांच्या मार्गदर्शनात पोहवा कुमरे, पोसी बोरकर यांनी केले.
पुढील तपास पोलीस स्टेशन करडी चे पोलीस अधिकारी करीत आहेत.



