क्राइम
जुगार अड्यावर धाड…
2,86,815 रुपयांचा मुद्देमाल जप्त
लाखनी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा केशलवाडा येथे
♦♣♥♠तास पत्ती खेळत असताना लाखनी पोलीसांनी धाड मारुन आरोपींच्या ताब्यातील 4 मोटर सायकल, 6 मोबाईल फोन आणि रक्कम असा एकुण 2 लाख 86 हजार 815 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये 7 आरोपी ला ताब्यात घेऊन अप. क्र. 328/2025 कलम 12( अ) म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, लाखनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पिसाड सा.

यांच्या मार्गदर्शनात सपोनि राजु सावळे,पोहवा गुलाब घासले यांनी केली.
पुढील तपास लाखनी पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



