“आयुष्यमान भव” मोहिमेचा उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे शुभारंभ:-जनतेने मोठ्या संख्येने या मोहिमेचा लाभ घ्यावे:- डॉक्टर धीरज लांबट (वैद्यकीय अधीक्षक तुमसर ).

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क// चॅनल
तुमसर वार्ता:-दिनांक 13 सप्टेंबरला तुमसर येथील सु.बो.शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे केंद्रशासनाची अत्यंत महत्त्वाकांची “आयुष्यमान भव” मोहिमेचे उद्घाटन माननीय श्री.सागर गभणे (अध्यक्ष राजमुद्रा ग्रुप व राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांच्या हस्ते व श्री.परमानंद कटरे (अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


आयुष्यमान भव ही मोहीम दिनांक 11 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत विविध आरोग्य विषयक उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार आहे. यात मुख्यत्वेकरून- पेशंट सेफ्टी वीक, आयुष्यमान आपल्या दारी 3.0, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावे, रक्तदान मोहीम. अवयव दान जागृती मोहीम, आयुष्यमान सभा, आयुष्यमान ग्रामसभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वय वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी, तसेच 18 वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रमांद्वारे आयुष्यमान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धीरज लांबट यांनी दिली.

