सामाजिक

ज्ञानज्योत फाउंडेशन व संत गाडगेबाबा विचारमंच च्या संयुक्त विद्यमाने शुभांगी शिंदे  लिखित पुस्तक प्रकाशन, पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव पश्चिम महाराष्ट्र सहसंपादक

पश्चिम महाराष्ट्र-
संत गाडगेमहाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य ओतुरज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमाने आयोजित शुभांगी शिंदे  लिखित कथासंग्रह
*कुंकू व कविता संग्रह *युगंधर* यशोदिप पब्लिकेशन प्रकाशित प्रकाशन सोहळा, राज्य स्तरीय ज्ञानज्योत पुरस्कार 2023काव्य गौरव पुरस्कार वितरण समारंभ तादात व उत्साहात संपन्न……
         सोहळ्याचे उद्घाटन आपला माणूस माजी नगरसेवक *मारूती तुपे (आबा) यांनी महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. प्रास्ताविक *कवयित्री कांचन मून* यांनी केले.पुस्तक प्रकाशन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा याचे निवेदन श्री वनशिव यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्रा. अनिल शिंदे यांनी केले.तसेच ज्ञानज्योत संस्थेचे मार्गदर्शक रघुनाथ कांबळे सर यांनी केले.


       उपस्थित आदरणीय म.भा.चव्हाण जेष्ठ साहित्यिक व गोल्ड कवी यांच्या हस्ते दोन ही पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. मनोगत व्यक्त करताना योग्य शब्दात पुस्तक प्रकाशन व कवींचे,लेखकाचे जीवन कसे घडते हे सांगितले.कुंकू कथासंग्रहाची प्रस्तावना आदरणीय जेष्ठ  कथाकार  बबन पोतदार यांनी केली त्यांनी मनोगत मध्ये कुंकू पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले.युगंधर पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे लोक कवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी यशोदिप पब्लिककेश प्रकाशिका रूपाली ताई ,साहित्य सम्राट पुणे चे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टूळ ,जेष्ठ साहित्यिक व कवी मदन देगावकर यांनी मोजक्या शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.  प्रमुख पाहूणे यात
दस्तूर  काॅलेज चे प्रिन्सिपल दिनेश देवकर सर व श्री प्रशांत सुरवसे सर यावेळी मंचावर उपस्थित होते.
   ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय  ज्ञानज्योत साहित्य सेवा पुरस्कार 2023 आ.अमोल घाटविसावे यांना देण्यात आला.राज्यस्तरिय ज्ञानज्योत पर्यावरण रक्षक पुरस्कार 2023 अशोक वाघमारे , जितेन सोनावणेसुनिता पवार (गवळी) यांना देण्यात आला. यावेळी पुरस्कार  मानपत्राचे वाचन कविता काळेकांचन मून यांनी केले.
    वर उल्लेख केलेल्या दोन ही संस्थेमार्फत साहित्य सम्राट लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यस्पर्धेत विजेते मान्यवर प्रथम क्रमांक सुभा लोंढे पुणे, व्दितीय क्रमांक बबन चव्हाण पुणे, तृतीय क्रमांक राजेंद्र साबळे ओतुरकर ठाणे, उत्तेजनार्थ क्रमांक अनिल नाटेकर आळंदीअंजली सामंत डहाणू यांना काव्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ज्ञानज्योत संस्थेचे ग्राफिक्सकार आदित्य मुन, सौजन्य मुर्ती उषा भरणे,संदिप सातपुते, करूणा कंद यांचा ही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संमेलन अध्यक्ष जेष्ठ गझलकार उद्धव महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करित उत्तम मार्गदर्शन केले व आपली गझल सादर केली.
यानंतर सत्र दुसरे कविसंमेलन अध्यक्ष नानाभाऊ माळी पुणे यांनी भुषविले यावेळी अनेक मान्यवर विचारांचा उपस्थित होते.अश्विनी वाळके यांनी कविसंमेलनाचे सुत्रसंचालन केले .यावेळी अनेक कवी/ कवयित्री मान्यवर अरूण कांबळे,  उमा लुकडे, सागर वाघमारे,सुभा लोंढे,डाॅ शुभा लोंढे,सनी बोरसे,सुरज सुभाष गवळी,अंगुले,सूर्यकांत नामुगडे,किशोर टिळेकर,जनाबापू,चंद्रकांत जोगदंड ,शुभम चांदणे ,विकी कांबळे, तानाजी शिंदे यांनी आपल्या उत्तम रचना सादर केल्या.कार्यक्रमाची सांगता सत्कारमुर्ती लेखिका सौ. शुभांगी शिंदे ताई यांनी आभार प्रदर्शनाने केले .
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन संत गाडगेमहाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य चे संस्थापक रणजित पवार, कोषाध्यक्ष गणेश पुणे, ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या संस्थापक अध्यक्ष कविता ताई काळेसंस्थापक कार्याध्यक्ष कांचन मून ,सदस्य शुभांगी शिंदे यांनी केले.
हा सोहळा हडपसर येथील  कन्यादान मंगल कार्यालय येथे 10/09/2023 संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button