आजी आजोबा दिनीअन्!भरली आजी आजोबांची चे शाळा!

वार्ताहर -कोंढाळी
दुर्गा प्रसाद पांडे
आज घडीला देशात मातृदिन, पितृदिन, महिला दिन एवढंच काय कन्यादिन, योग दिन असे विविध दिवस साजरे केले जातात. मात्र लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रांगणात १२सप्टेबर रोजी दुपारी तीन ते पाच वाजे चे दरम्यान आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे यांनी आजी आजोबा दिवसाचे महत्व व शासनाच्या शासन निर्णयाची माहिती दिली.तसेच दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. . या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा रेखाताई राठी, ज्येष्ठ नागरिक अमर अली सौय्यद, दत्तात्रय तेटे, दुर्गा प्रसाद पांडे, यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू करण्यात आला.
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरंतर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं, खास असतं. आजी-आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे, असं सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

वर्षातून एक दिवस आजी-आजोबा दिवस साजरा करण्याच्या शाळांना सूचना
शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्याच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करुन मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पा गोष्टी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी “आजी आजोबा” दिवस शाळेत साजरा करणं संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचं आहे. मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी “आजी आजोबा” दिवस साजरा होणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने यावर्षी 12 सप्टेंबर, 2023 रोजी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा करण्यात आला. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि शाळास्तरावर त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात यावा.
या दिवशी आजी-आजोबांसाठी घेण्यात आलेले उपक्रम
सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करुन दिला.
आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
संगीत खुर्ची ,लिंबू चमचा, गोळा फेक, मामाच पत्र, सामान्य ज्ञान,असे खेळ सुद्धा घेण्यात आले.
खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करूनदेण्यात आल्या.
आजी आजोबांसोबत शाळेतील शिक्षक व नातवंडे सुद्धा सहभागी झाले होते.
पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबांना आले होते.
आजी आजोबांनी विद्यार्थ्यांना झाडे लावणे व जगवने आणि पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या प्रसंगी कैलास थुल , मनोज ढाले, हरिष राठी दुर्गा भट्टड संगीता धारपुरे ज्ञानेश्वर भक्ती भूषण राचलवार समीर लोणारे आम्रपाली बागडे सुनिता नेहारे सुनील सोलव यांनी सहकार्य केले.



