बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती साजरी करावी

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सम्राट अशोक सेने तर्फे निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) भारतातील महान विश्वविजेता देवानाम प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती शासनाने दरवर्षी बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक स्तरावर साजरी करावी याकरिता सम्राट अशोक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोज मंगळवार ला निवेदन देण्यात आले .याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जपुती -2020/ प्र क्रमांक 95/ 29 दिनांक 15 /12/ 2020 नुसार सन 2021 मध्ये मंत्रालय शासकीय शासकीय /निशासकीय कार्यालयात साजरे रावयाच्या जयंती /राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी जाहीर करण्यात आली. सदर यादीची अवलोकन केले असता त्या यादीमध्ये भारतातील महान राजा प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे नाव समाविष्ट नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे शासनाप्रती जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. भारतात जेवढे काही राजे महाराजे होऊन गेले त्यांना सम्राट ही पदी मिळालेली नाही .फक्त सम्राट ही पदवी राजा अशोकालाच मिळाली आहे .पाश्चिमात्य देशातील काही इंग्रज विद्वान लेखकांनी सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या गौरव करून इतिहास लिहिला आहे. सम्राट अशोके सर्व राजे महाराजांमध्ये महान ठरले कारण ते त्यांच्या कारकिर्दीत एकही लढाई हरले नाही. अशोकांच्या जीवन काळामध्ये कलिंग युद्ध हे अंतिम युद्ध ठरले . कलिंगच्या युद्धामध्ये एक लाख 50 हजार व्यक्ती बंदी केले होतेस. तसेच एक लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले. हजारो घोडे, हत्ती मारले गेले .हा एवढा मोठा नरहासंर पाहिल्यानंतर सम्राट अशोकांचे मन गहिवरले त्यांचे मन परिवर्तन झाले आणि ह्यानंतर मी युद्ध कधीच करणार नाही अशी प्रतिज्ञा करून त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला .सम्राट अशोकाने त्यांचे धर्मगुरू मोगली पुत्र यांच्या प्रेरणेने देशात तीर्थयात्रा केली जिथे जिथे गेले त्या ठिकाणी त्यांनी स्मारक स्वरूप तूप, विहार निर्माण केले .तसेच दगडी स्तंभ उभे करून त्यावर लेख करून घेतले. हे शिलालेख तथा स्तंभ आजही देशाला प्राचीन भारतीय इतिहासाची साक्ष देतात. अशोकाने सारनाथ येथे चार सिंह वाला शिलास्तंभ बनवून घेतला .सम्राट अशोकाचा हा स्तंभ चीन ,जपान, रशिया ऑस्ट्रेलिया या देशात दिसून येतो. अशोक चक्र हे शांतीचे प्रतीक मानले जाते .अशोक कालीन स्तंभावरील सिंह मुद्रा भारताची राजमुद्रा म्हणून मान्यता प्राप्त आहे .सन 26 नोव्हेंबर 1949 मध्ये जगातील सर्वात मोठे भारताचे संविधान तयार झाले त्या संविधानात प्रामुख्याने बुद्ध तत्त्वज्ञानातील मूलतत्त्व समता, स्वातंत्र्य, बंधुता ,आणि न्याय ही तत्वे समाविष्ट आहेत. तथागत बुद्ध द्वारा उपदेशित प्रतीते समूपात आणि आर्य अष्टांगिक मार्गाचे आधारावर सम्राट अशोकांनी धम्मचक्र तयार करून घेतले होते ते संविधान सभेत अशोक चक्र म्हणून स्वीकृत करण्यात आले. जे भारताच्या राष्ट्रध्वजावर अंकित आहेत .सम्राट अशोकाने सत्यमेव जयते राष्ट्रीय स्तरावर मानले जाते. सम्राट अशोकांनी आपल्या कार्यकाळात 23 विश्वविद्यालय स्थापित केली. यामध्ये तक्षशिला, नालंदा ,विक्रमशीला ,कंधार इत्यादीचा समावेश होतो. त्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशातील विद्यार्थी भारतात येत होते .भारतातील सैन्य दलात सर्वोच्च पुरस्कार म्हणून सम्राट अशोक यांचे नावावर अशोक चक्र प्रदान करण्यात येतो .सम्राट अशोकाच्या काळात जनता सुखी संपन्न आणि भेदभाव रयत जीवन जगत होती .सम्राट अशोकांनी प्रसिद्ध महामार्ग ग्रेट ट्रॅक रोड सारखे महामार्ग बनविले. महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे लावली तसेच विहिरी मधून प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सोय केली. सम्राट अशोकांनी स्त्री शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली सम्राट अशोक हे पहिले सम्राट होते की ज्यांनी आपल्या प्रजेला शिक्षित करण्याचा प्रयत्न केला .सम्राट अशोकांनी मनुष्यांकरता दवाखाने बांधले तसेच मुक्या प्राणी जनावरांसाठी दवाखाने निर्माण करणारा जगातील पहिला सम्राट मानला जातो .सम्राट अशोकाच्या पूर्वी किंवा नंतर असा कोणी राजा झाला नाही .ज्याने अखंड भारत जो आजच्या नेपाळ ,भूतान बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान म्हणजे म्यानमार पासून तर इराक इराण पर्यंतचा प्रदेश ह्या मोठ्या भूभागावर छत्र राज्य केले. असे महान देवनाम प्रिय प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती आपल्या देशात साजरी करणे महत्त्वाचे आहे . करिता महाराष्ट्र शासनाने आमच्या निवेदनावर विचार करून खालील मागण्या सादर करीत आहोत देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शासनाद्वारा महान विश्वविजेता देवांना प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात यावी जेणेकरून सम्राट अशोकाचे जीवन कार्य आणि शासन प्रणाली सामान्य जनतेला तरुण पिढीला माहिती देईल त्यासाठी मंत्रालय शासकीय नियम शासकीय कार्यालयात साजरी करण्याच्या जयंती राष्ट्रीय दिन कार्यक्रमाच्या यादीमध्ये महान सम्राट अशोक यांचे नाव समाविष्ट करण्यात यावे बिहार सरकारने सम्राट अशोक जयंतीची सुट्टी जाहीर केलेली आहे त्याच जातीवर महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करावी इत्यादी मागण्यांचे निवेदन सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम यांच्या नेतृत्वात देण्यात आले .यावेळी सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव भांबोरे माजी समाज कल्याण सभापती चरणदास मेश्राम ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप वानखेडे ,धनपाल गडपायले, सामाजिक कार्यकर्ते शंकर भेंडारकर ,सामाजिक कार्यकर्ते सुरजभान चव्हाण ,मिलिंद सुखदेवे, पत्रकार डी जी रंगारी ,अशोक गायधने ,जगन्नाथ गणवीर ,अरविंद मेश्राम ,मंदा खंडाळे, ताराचंद नंदागवळी नाव पंचशीला शिलाराम मडावी रेखा रामटेके शितल नागदिवे तनुजा नागदिवे उपस्थित होते



