राज्य
झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरणाचे संरक्षण करा:-जंगलातुन गराडी टेब्रुन,भेरा,सातावरी मारबत या झाडांच्या फांद्या व झाडांची कत्तल करु नये -सि.जी.रहांगडाले(वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर)

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलातून गराडी टेब्रुन भेरा या जातीच्या झाडाच्या फांद्या तोडू नये कारण की या झाडापासून जंगलाचा सर्रास कत्तल होत असून या झाडाच्या पासून औषधी तयार होत असते .व या झाडाच्या फांद्यावर पक्षी थांबतात व पक्ष्यांना संरक्षण मिळत असतो व सरासन झाडाच्या फांद्या मारबत च्या दिवशी मारबत म्हणून जंगलातून आणत असतात पण त्या फांद्या पासून व झाडापासून औषधी बनत असते त्यामुळे कोणत्याही नागरीकांनी त्या झाडाच्या फांद्या ची व झाडांची कत्तल केल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी त्या झाडाच्या फांद्या ची कत्तल करूनये व पर्यावरणाचे संरक्षण करावे तसेच वन्यप्राणीची शिकार करू नये केल्यास भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत कारवाई केली जाते.तसेच शेतकऱ्यांनी शेता सभोवताल जिवंत करंट लावल्याने निष्माम जीवाचा बळी जातो त्याच्यावर गुण्हा दाखल होतो .त्यामुळे कोणी ही जंगलातून फांद्या व झाडांची कत्तल केल्यास वनविभाग अंतर्गत गुण्हा दाखल होतो त्यामुळे कोणीही गराडी, सतावरि टेब्रुन,मेरा,सर्रासन झाडाच्या फांद्या व झाडांची कत्तल करू नये व जंगल शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील सभोवताल जीवंत करंट लावु नये .त्यापासून निष्पाप जीवांचा बळीचा घेतला जातो व कुणीही कुंपणाला विध्तावुट करंट लावु नये व लावल्यास व एखाद्या पक्षी ,प्राणी अडकून प्राण पावला तर गुण्हा दाखल होतो . त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी यांची जिवित हाणी व उचित प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा.असे तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी जी रांगडाले यांनी कळविले आहे.



