शालेय

बघेडा येथील अरविंद विद्यालयात लवकरच सुरू होणार डिजिटल लायब्ररीश्री प्रशांतजी मिश्रा यांची आर्थिक मदत

महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या सहकार्याने व क्लिक टू क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड नागपूर चे सीईओ श्री. प्रशांतजी मिश्रा यांच्या आर्थिक मदतीतून बघेडा येथील अरविंद विद्यालयात डिजिटल लायब्ररी चे कार्य सुरू करण्यात आले.

काहि दिवसांपुर्वी श्री. प्रशांत मिश्रा यांनी स्वतः शाळेला भेट देऊन शाळेत येणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत डिजिटल शिक्षण कसे देता येईल यावर चर्चा करून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कामाला सुरुवात करून दिली. या प्रसंगी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान,तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितिन धांडे, छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, बघेडाचे अध्यक्ष नवनीत चौधरी, सचिव शुभम निमकर, कोषाध्यक्ष रोशन तरटे, शुभम नागमोते, अरविंद विद्यालय बघेडाचे मुख्याध्यापक श्री. तितिरमारे सर, श्री चांदेवार सर, श्री. गौपाले सर, कु. पल्लवी ठाकुर, कु. पूजा पटले व विद्यार्थी उपस्थित होते. छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने केलेल्या या मागणीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button