राज्य
२४वर्ष देश सेवा करूननिवृत्त अरविंद उमप यांचा भव्य सत्कार

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

कोंढाळी -प्रतिनीधी -दुर्गाप्रसाद पांडे
भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अशात काटोल तालुक्यातील पंचधार या गावचे सुपुत्र अरविंद उमप यांनी 24 वर्षे देशाची अविरत सेवा केली. मराठा रेजिमेंटमध्ये तब्बल 24 वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त होत ते आपल्या जन्मभूमीत परतले आहे. हवालदार अरविंद उमप यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. गावभर त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कचारी सावंगा ग्रामपंचायतीने देखील सन्माचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच रवी जयस्वाल, उपसरपंच वंदना निकोसे, ग्राम विकास अधिकारी पी जी लोलुसरे ,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




