गोंदियात कावीळ प्रतिबंधजनजागरण अभियान

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा न्युज नेटवर्क//चॅनल
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
राष्ट्रीय कावीळ नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 28 जुलै ते 4 जुलै 23 दरम्यान कावीळ जनजागृती सप्ताह आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

(-9765928259)
या सप्ताहाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर डॉ बी डी जैस्वाल
कावीळ नियंत्रण कार्यक्रम संयोजिका कु तुरकर ऍड रेखा सपाटे सिकल सेल समुपदेशक निशा डहाके आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या
या वेळी जागतिक कावीळ नियंत्रण सप्ताह बाबत सविस्तर माहिती जिल्हा समनव्यविका कु तुरकर यांनी विशद केली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी आवाहन केले की कावीळ वर गोंदिया जिल्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध आहे .कावीळ ची शंका वाटल्यास मोफत रक्त तपासणी नजीक च्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये जाऊन करून घ्यावी. डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की सरकारी दवाखान्यात कावीळ ची लस मोफत उपलब्ध आहे लसीकरण हा कावीळ प्रतिबंध चा चांगला उपाय आहे. हिपॅटायटीस बी झालेल्या रुग्णांनी कधीच रक्तदान करू नये.दूषित पाण्यातून हिपॅटायटीस ए पसरतो म्हणून पावसाळ्यात पाणी गाळून व उकळून फिल्टर चे पाणी प्यावे कारण
कावीळ वर प्रतिबंध हाच एक उपाय आहे .
या वेळी कावीळ आजाराची सविस्तर सचित्र माहिती देणारे आरोग्य पत्रके उपस्थित महिलांना वाटण्यात आली . राष्ट्रीय कावीळ प्रतिबंध संबंधी आरोग्य प्रदर्शनी ला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

