कुंभेज चांदणे वस्ती येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची१०३ व्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न.

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र )सह संपादक
करमाळा कुंभेज चांदणे वस्ती येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या जगात दीड दिवस शाळेत जावुन साहित्यरत्न लोकशाहीर झाले, आण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारकापैकी एक समाज सुधारक होते, आण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक होतेच त्याचबरोबर ते एक साहित्यक, कथालेखक, कांदबरीकर होते, त्यांनी कांदबरी, कथा, व्यतिरिक्त पोवाडे, लावणी, अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले त्यांनी लिहिलेल्या काही कादंबरीवर चित्रपट निर्माण झाले, त्यांनी लिहिलेल्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट कांदबरी म्हणून गौरविण्यात आले, अशा या थोर समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती कुंभेज चांदणे वस्ती येथे साजरी करण्यात आली, यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन मातंग अस्मिता संघर्ष सेना सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा सौ आशाताई चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच उपस्थित सर्व समाज बांधवांनी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पुजा केली,,यावेळी उपस्थित मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा सौ आशाताई चांदणे, श्री.सुभाष चांदणे,श्री.संतोष चांदणे,श्री.संजय चांदणे,श्री.तानाजी चांदणे,श्री.दिलिप पवळ, विजय शिंदे,,शाम खरात, अक्षय पवळ, परशुराम चांदणे,रोहीत चांदणे,श्री.अर्जुन पाटोळे,बापु चांदणे,प्रेमराज चांदणे,रोहन चांदणे,,महेश चांदणे,श्री.बंडु चांदणे,योगेश चांदणे,आबा चांदणे,सौ.लक्ष्मी चांदणे,स्वाती चांदणे,वैशाली चांदणे,विमल पाटोळे,मालन चांदणे,तसेच वस्ती वरिल सर्व समाज बांधव व भगिनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने, उत्साहाने, आनंदाने ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चांदणे वस्ती वरिल सर्व समाज बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.



