राजकीय
भंडारा जिल्हा महिला काँग्रेस तर्फे मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी याबाबत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती मा. द्रोपदी मुर्मुजी यांना निवेदन करण्यात आले

महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

$पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क $
मणिपूर येथे 78 दिवसापूर्वीपासून चाललेल्या हिंसाचारात कुकी आदिवासी महिलांना लग्न करून धिंड काढण्यात आली. त्यांच्या गुप्तांगाशी अश्लील चाळे करण्यात आले. त्या आदिवासी महिलेचा भाऊ व वडील जेव्हा तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो तर त्यांना मारून टाकण्यात आले. त्या महिलांपैकी एका महिलेचा पती भारतीय सेनेत कार्यरत होता तो देशाचा संरक्षण करू शकला पण स्वतःच्या पत्नी चे संरक्षण करू शकला नाही याची खंत व्यक्त करीत आहे . पोलीस प्रशासन स्वस्थ बसलेले होते.हा प्रकार जवळपास अडीच महिने दाबून ठेवण्यात आला . हे कृत्य माणुसकीला हादरवणारे, अंगावर शहारे आणणारे, अमानवीय असून केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आणि ते कोणतीही कार्यवाही करण्यात असमर्थ ठरत असेल तर आम्ही देशाच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मुजी स्वतः एक महिला असून आदिवासी आहे त्यांना आम्ही अशी मागणी करतो कि या आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडावी . त्यांना न्याय मिळवून देऊन समस्त स्त्री जातीचे संरक्षण करावे . मणिपूर येथील मुख्यमंत्री विरेन सिंह यांची पदावरून हकलपट्टी करण्यात यावी. व देशाचे पंतप्रधान मा.मोदीजी यांनी नैतिकदृष्ट्या स्वतःचा राजीनामा द्यावा. व त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ जयश्री बोरकर यांनी केली. यावेळी भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष सौ जयश्री बोरकर, जी प सभापती स्वाती जी प सदस्या विद्या कुंभारे, मंजुषा चव्हाण अनु जाती जिल्हाध्यक्ष, राजकापूर राऊत , जिल्हा उपाध्यक्ष नवाब पटेल, किशोर राऊत, विनितकुमार देशपांडे, पवन मस्के, पूजा ठवकर, रीना हटवार, कांचन काटेखाये, भारती कांबळे, गुलशन चौव्हाण, पूजा काळे, अनिता काळे, शुभांगी नंदनवार, जयेंद्र , सोनू भाऊ कोटवानी, नरेंद्र मनापुरे, प्रेमांशू दयाल, दीपक पवार, अरुण गडकरी, उमेश थोमेश, संतोष अवसारे, प्रज्ञ्या नंदेश्वर, नंदा मोगरे, सारिका नागदेवे, कुंदा आगासे, स्नेहा भोवते, यशोदा सार्वे, पुष्पा डुंभारे, कल्याणी भिवगडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
