शालेय

वैयक्तिक विकासा सोबत समाजाचाही विकास करा- इंजि. नितिन धांडे

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी दशेपासून लक्ष केंद्रित करून परिश्रम आणि सातत्य ठेऊन अभ्यास आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन घेऊन स्पर्धा परीक्षांचा मार्ग अवलंबून जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते इंजि. नितिन धांडे यांनी केले. तुमसर येथे आयोजित AM करियर अकैडमी माध्यमातुन दोन दिवसीय आयोजित ‘एमपीएससी’ व ‘यूपीएससी’ मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणाऱ्या अशा कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. AM करियर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीपभाऊ सार्वे, मीटेवानी केंद्र प्रमुख श्री. ठाकरे सर, छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान,तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितिन धांडे, नेहरू विद्यालया येथील शिक्षक श्री लेनगुरे सर, बालूभाऊ सेलोकर व मांडवी येथिल आदर्श शिक्षक श्री दामोदरजी डहाळे सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजेत, स्पर्धा परीक्षा स्वरूप काय आहे व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ‘एमपीएससी’ व ‘यूपीएससी’ व इतर स्पर्धा परीक्षा या विषयी मार्गदर्शन झाले. उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन करीत विध्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला, विद्यार्थीयांच्या व AM करियर अकैडमी च्या भविष्या करिता शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली. प्रास्ताविक हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध युट्यूबर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन श्री. आशिष मगर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन AM करियर अकैडमी चे संचालक श्री. अंकित मिश्रा सर तर आभार प्रदर्शन श्री दामोधर डहाळे सर यांनी केले.

स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
महिला प्रतिनिधी
पोलिस की आवाज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button