शालेय विद्यार्थ्यांना पेन, वह्या व रजिस्टर चे वाटप करून अचल मेश्राम यांचा वाढदिवस साजरा

संजीव भांबोरे
भंडारा: ( ऑल इंडिया प्रतिनिधी )मागिल अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे अचल मेश्राम यांचा ५८ वा वाढदिवस जिल्ह्यातील विविध समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा व पंचशील पुर्व माध्यमिक शाळा भंडारा येथील शालेय विद्यार्थ्यांना उपक्रम म्हणून रजिस्टर, वही व पेन देऊन साजरा करण्यात आला. ते करीत असलेल्या अविरत सामाजिक क्षेत्रातील मौलिक कार्याचे कौतुक म्हणून जिल्ह्यातील विविध समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांना भारतीय संविधान, समाज जीवन गौरव पुरस्कार व शाल प्रदान करुन त्यांच्या सामाजिक कार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकून भावी यशस्वी वाटचालीकरिता व दिर्घ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर उपक्रम व वाढदिवस रोषन जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली व परमानंद मेश्राम, सुर्यभान हुमने, लोकशाहिर अंबादास नागदेवे, कवी तथा साहित्यिक नाशिक चवरे,, आशित बागडे, हरिश्चंद्र धांडेकर, मुख्याध्यापक पुरुषोत्तम तांबे, मुख्याध्यापक राकेश शंभरकर, हेमा गजभिये, यशवंत नंदेश्वर, प्रा. अनमोल देशपांडे, सिद्धार्थ भोवते,
उषा मेश्राम, मिताली भैसारे, पारुल पिटर, दिनेश मेश्राम, भजनदास मेश्राम, भागवत मेश्राम, सायवान मेश्राम व बहुसंख्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

