राष्ट्रवादी युवती काँग्रेस राजकारणासाठी नसून सामाजिक बदल घडवून आण्यसाठी काम करणारी संघटना आहे

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क :-राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, भंडारा
समाज बंधनाला न जुमानता स्त्री शिक्षणाचा पाया रोवून समस्त स्त्री वर्गाला उत्तुंग झेप घेण्यासाठी पंख देणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आज दि. ०६/०१/२०२३ रोजी राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे वर्षाच्या सुरुवातीला एक नवीन संकल्प करण्यात आला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेस राजकारणासाठी नसून सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी काम करणारी आहे, हि जाणीव लक्षात घेऊन युवती सोबत चर्चा व सवांद साधन्या करीता प्रत्येक महिन्याचा पहिल्या शुक्रवार ला पक्ष कार्यालय भंडारा येथे दुपारी २ ते ४ या वेळात युवती जिल्हाध्यक्ष ॲड. नेहा शेंडे व युवती काँग्रेसच्या ईतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील युवतींचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक प्रश्न सोडवून सल्ला व मार्गदर्शन देण्याचा छोटेखानी प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमाला आज पासून सुरुवात करण्यात आली.

करिता शहर व ग्रामीण भागातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घेवुन सहकार्य करावे, हि विनंती युवती जिल्हाध्यक्ष ॲड. नेहा शेंडे यांनी केली.
