जिल्हा

पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला तरच समाजात शांतता प्रस्थापित- डॉ गोविंद कोडवानी

तुमसर येथे पत्रकार दिवस साजरा

संजीव भांबोरे//राजेश ऊके
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पत्रकारांनी आपला आवाज क्षीण होऊ देता कामा नये. ‘जटायू’ पक्षाने रावणा विरोधात जसा लढा दिला, त्याप्रमाणे पत्रकारांनी समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. देशात गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत. या प्रश्नांना वाचा फोडली, तर समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. असे प्रतिपादन डॉ गोविंद कोडवानी यांनी केले.
ते तालुका प्रेस वेल्फेअर असोशियनतर्फे आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनाचे आयोजन येथील हॉटेल पंचशील मध्ये करण्यात आले त्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, सुनील थोटे मंचकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांनी दर्पणकार यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी मार्गदर्शन करताना सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक पत्रकारिता ही सध्याची गरज आहे. देश, राज्य व शहराचा विकास व समाजातील सकारात्मकता हीच खरी पत्रकारिता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली पाहिजे. असे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल डोंगरे यांनी तर उपस्थितांचे आभार अनिल कारेमोरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष प्रा. राहुल डोंगरे, उपाध्यक्ष देवचंद टेंभरे, सचिव अनिल कारेमोरे, प्रा. रवींद्र साकुले, राहुल भुतांगे, रोहित बांबोर्डे,सुरेंद्र चिंधालोरे, संजय निमाडे, जीवन वनवे, क्षितिज भुरे , हर्षल खडसे, दिगंबर देशभ्रतार यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button