शालेय

२० जिल्हा परिषद शिक्षकांच्या केंद्रस्तरीय सेवानिवृत्ती सत्कार साकोली संपन्न ,शिक्षकवृंद झाले भावुक

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) जिल्हा परिषद केंद्र साकोली कडून नुकतेच शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या २० शिक्षक व शिक्षिकेंचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. ०१ गणेश वार्ड साकोली येथे ( ०५. जाने.) ला संपन्न झाला. 
        सदर कार्यक्रमास मंचावर अध्यक्ष केंद्र प्रमुख हिरामण वाघाये, अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी एच. एस. भलावी, सुखराम पडोळे, मुख्याध्यापक डि.डी. वलथरे आदी हजर होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सत्कार कार्यक्रमात सन २०२० ते २०२२ पर्यंत शिक्षण विभागातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षिकेंचा सपत्निक शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला यात गिता बोरकर, किशोर गोस्वामी, वसंत गायकवाड, आर टी परशुराकर, टि टी कांबळे, दामोदर खरवडे, हिवराज लंजे, आर पी दूपारे, रंजना वाघमारे, इंदिरा कसारे, बलदेव चांदेवार, दुष्यंत साखरे, डि एस मडकवार, धनिराम सुर्यवंशी, उल्हास कापगते, इ. स. लंजे, भाऊराव समरीत, निर्मला वाडीभस्मे, संध्या गहरवार व मंगला वाघमारे या २० शिक्षकांचा समावेश होता. मंचावरून अतिथींनी सेवानिवृत्त शिक्षकांकडून शिक्षण सेवेसाठी घरी राहूनही गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मार्गदर्शन ही निरंतर सेवा प्रदान करण्याची विनंतीही केली. सेवानिवृत्ती शिक्षकांनीही आपल्या मनोगतामधे शिक्षण सेवेतील अविस्मरणीय क्षणांची आठवण करून दिली व सेवेतील ते दिवस कधीच विसरू शकणार नाही असे प्रतिपादन करतांना मात्र भावूक झाले होते. सत्कार समारंभात संचालन सुरेश हर्षे यांनी तर आभारप्रदर्शन बोंद्रे गुरूजी यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button