राज्य
महातपुरी शिवारात रानडुकरांच्या धुमाकूळ ज्वारी पिकांची नासाडी
रानडुकरांच्या बंदोबस्त करून ज्वारी पिकांची नुकसान भरपाई द्यावी -मल्हारी सोनकांबळे

परभणी (संजीव भांबोरे) जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील महातपुरी शिवारात रानडुकराने धुमाकूळ घातला असून ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला असून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून भरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा .अशी मागणी मल्हारी सोनकांबळे यांनी केलेली आहे.




