राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास संपादन करून
प्रहार, शिंदे गट,भाजप,व अन्य पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील अड्याळ येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत गणेश सभागृह, येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक प्रसंगी अड्याळ, नेरला व पिंपळगाव को. येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी लढणारे खासदार प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर, महेश कुंभलकर यांच्या समवेत
नेरला येथील प्रहार गटाचे सचिन लोहारे यांच्या समवेत उमेश बोरीकर, श्रीराम मुरकुटे, सौरभ भोगे, आशिष नागनावरे, निकेश कुटकर, प्रज्वल नारनवरे, विशाल रोहनकर, किशोर दिघोरी, प्रणय ढोक, देवानंद वाकडे, सुरज ढोक, शुभम नान्हे, पतीराम मोहरकर, रतीराम मोहरकर, शुभम लोहारे, विष्णू लोहारे, पराग दहिवले, शुभम नांन्हे, अक्षय ढोक, देवानंद कारमेंगे, छगन भोयर, राजू ठाकरे, रूषी रणदिवे, सतीश गायकवाड, मयूर आरीकर, बादल भोयर, शुभंम लाेहारे, अतुल लाेहारे, सनिल मुरकुटे, राेशन मुरकुटे, संदिप नारनवरे पिंपळगाव को. येथील शिंदे गटाचे सचिन गजानन पंचभाई, अंबादास रामजी मरघडे, रूपेश भगवानजी जिभकाटे, प्रभाकर शंकरराव जिभकाटे, पवन पुरूषाेेत्तम येळने, अमित दादाराव बिलवणे, देवदत्त गुलाबराव मेश्राम, ईश्वर वासुदेव पंचभाई, गाेपाल मधुकर गाडेकर, मनाेहर नामदेव मरघडे, सचिन वसंतराव माेहरकर, राेहीत जलाराम येळणे, भुषन एकनाथ जाबुळकर यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रफुल पटेल यांनी सर्व पक्ष प्रवेशित कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकरराव कुकडे ,आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार राजेंद्रजी जैन माजी आमदार, धनंजय दलाल प्रदेश सरचिटणीस, सुनीलभाऊ फुंडे अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक ,शैलेश मयूर विधानसभा अध्यक्ष, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button