राजकीय

राष्ट्रवादीचे माजी आम. अनिल बावनकर यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत झाला पक्ष प्रवेश….

भंडारा:राजेश ऊके(मुख्य संपादक, पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)

तुमसर विधानसभेचे माजी आम. अनिल बावनकर आणि तुमसर चे स्थानिक नेता मिलिंद रामटेके यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. बावनकर यांच्या सोबत त्यांच्या सहकार्‍यांनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भंडारा येथे झालेल्या सभेत हा प्रवेश घेतला.
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भंडारा येथील 200 कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या भव्य सभेत माजी आमदार अनिल बावनकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करीत शिंदे साहेबांचे नेतृत्व स्विकारले. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री शिंदे यांनी कमी वेळातच भंडारा जिल्ह्या करिता इतका मोठा निधी दिला आणि भंडाराचे हित जोपासले. या विकास कामा मुळे जिल्ह्यातील अनेक लोकांना रोजगार सुद्धा मिळणार. शिंदे साहेबां कडून होत असलेल्या या सहकाऱ्याला प्रभावित होवून त्यांनी हे नेतृत्व स्विकारले आहे. अनिल बावनकर हे तुमसर विधान सभा क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉँग्रेस चे माजी आमदार असून त्यांच्या सोबत तुमसर च्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button