मनोरंजन

कलेला आकार देणारा खरा माणूस -मनोजभाऊ कोटांगले

संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी )- साकोली तालुक्यातील एकोडी नगरीतील मनोज कोटांगले कला विश्वातील एक कोहिनूर हिरा .
आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दडवळावा
पाव्यातला सुर जैसा
ओठातूनी ओघळावा
अशी आनंदाची बरसात आपल्यावर सदोदित होत राहो. कला ही कलाकाराचा श्वास आहे. त्याचे जीवन आहे. त्याचा ध्यास आहे. त्याची उद्याची आस आहे. मग ती ललित कला असो वा इतर कला असोत. त्यात त्या कलावंताला झिजावे लागते, मुरावे लागते तेव्हा त्याचे कलाविश्व असमंतामध्ये चंदनाच्या परिमाणासारखे सुगंधीत होऊन दळवायला लागते अशाच कलेचे भाव विश्व फुलवणारा कलेचा मुरब्बी साधक कोण असेल तर तो म्हणजे मनोज एकनाथ कोटांगले मु. एकोडी तहसील साकोली जिल्हा भंडारा या ग्रामीण भागात जन्माला येऊन आज कला जगताच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान होऊन महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील इतर राज्यात सुद्धा त्याने आपल्या कलेचा डंका वाजविलेला आहे.
मनोज कोटांगले यांच्या कार्यकर्तृत्वाचा तपशील घेत असताना असे निदर्शनास येते की तो एक निसर्गदत्त कवी, गायक, उत्तम नकलाकार, उत्तम नाटककार म्हणून त्यांच्या आवर्जून उल्लेख करावा लागेल. मनोज बाबू चे गाणे म्हटलं की गर्दी होणारच! अत्यंत साध्या सोप्या, रंगतदार आपल्या मधुर पहाडी आवाजाची जादू श्रोत्यांच्या अंतरंगाचा जणू काही ठावच घेणारी ठरते. मनोरंजनातून प्रबोधन ही त्यांची हातोटी आहे. एवढेच नव्हे तर एक समाज मनाचे भान जपणारा कवी त्यांच्या व्यक्तित्वात ऊतपोत भरला आहे त्यांची कविता गीत एका वास्तव समाज जीवनाचा परामर्स घेतात. कारण”जे जीवनाशी निरंतर सोबत करते तेच खरे साहित्य असते अशी त्यांची धारणा आहे.
मनोज भाऊंनी एक छोटासा कलापथक मंडळ स्थापन करून बघता बघता आपल्या एकोडी नगरीत विदर्भस्तरीय लोककला महोत्सव घेऊन जणू काही शून्यातून विश्वाची निर्मिती केली. हा रांगडा कलावंत एवढ्यावरच थांबला नाही तर प्रत्येक गावागावात जाऊन जनजागृती चे काम करायला सुद्धा अग्रेसरच असतो लोकांना अंधश्रद्धा, वेसन मुक्ती, दारूबंदी यासारख्या वाईट परंपरांवर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून उदबोधन करतो. कोणत्याही अर्थार्जनाची मनीषा ना बाळगता जनतेने दिलेला कॉल त्याला मान्य असतो. एक उत्कृष्ट तबला पटू, कव्वाल, गायक, कवी असे अनेक आयामाने परिपूर्ण व्यक्ति मनोज भाऊ यांच्या व्यक्तित्वात ठासून भरलेली आहे.
कृषी शास्त्राची पदवी घेऊन सुद्धा नियतीने साथ न दिल्यामुळे परिस्थिती कोणती आली असेल तरी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा मर्द म्हणून आलेल्या परिस्थितीवर मात करून उसाच्या शैल शिखरावर विराजमान होतो. एक लोक गीताचा बेताज बादशाह म्हणून त्यांनी आपलं नाव लौकिक केले आहे संपूर्ण यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सहचरणी आयुष्य मती तीरुताई कोटांगले यांच्या सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या कार्यकर्तुत्वाची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
जिल्हा युवा नेहरू पुरस्कार ,
ग्लोबल महाराष्ट्र पर्यटन ठाणे जिल्हा पर्यटन महोत्सव २०२२
राज्यस्तरीय कलावंत गौरव पुरस्कार,
शासनाच्या विविध विभागामार्फत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर भीमराव आंबेडकर, संत श्रेष्ठ गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार ते आवर्जून करतात.
या त्यांच्या सर्व कार्याची दखल शासनाने घेऊन त्यांच्या यतुचित सन्मान करावा हीच अपेक्षा! तेव्हाच खऱ्या अर्थाने एकोडी नगरीतील हा कलावंत कला विश्वातील कोहिनूर हिऱ्याला खरा न्याय मिळेल यात यातील मात्र शंका नाही. मनोज भाऊ यांना त्यांच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.

संकलन प्रा. धनंजय बावणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button