स्मार्ट मीटर लावण्याच्या जबरदस्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक — ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसणार नाही
भंडारा :
विज वितरण विभागाकडून ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. याच्या तीव्र निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज दि. 20 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता अधीक्षक अभियंता श्री गिरी यांच्या वीज वितरण कार्यालय, विद्यनगर भंडारा येथे भव्य निवेदन कार्यक्रम पार पडला.
या निवेदन कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात शहराध्यक्ष मधुकर चौधरी, जिल्हा सरचिटणीस विनोद वट्टी, युवा जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, भंडारा तालुका अध्यक्ष अनिल सार्वे, प्रदेश सदस्य चंद्रशेखर भिवगडे, महिला जिल्हा अध्यक्षा राणी ताई ढेंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व प्रमुख उपस्थिती :
उर्मिलाताई आगाशे, भास्कर हटवार, संजय खंडाईत, रतन थाटकर, गितेश ठोंबरे, यशवंत भोयर, संजय बागडे, स्वप्नील येरणे, विवेक बडगे, हरिश्चंद्र धकाते, शायना खान (महिला शहराध्यक्ष), प्रमोद चव्हाण, सुनील बानते, इंद्रजित येळणे, मायाप्रसाद बावनकुळे, लता बावनकुळे, नीलिमा रामटेके (युवती जिल्हाध्यक्षा), बाळा वाडीभस्मे व राजा खान यांनी यामध्ये सहभाग घेतला.
निवेदनादरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला की,
“यापुढे ग्राहकांची संमती घेऊनच स्मार्ट मीटर बसविले जातील. कोणत्याही ग्राहकावर बळजबरी केली जाणार नाही.”
तसेच स्मार्ट मीटर बसवणाऱ्या एजन्सींना याबाबत तात्काळ सूचना देण्यात येणार असल्याचे वीज वितरण विभागाने स्पष्ट केले.
ग्राहक नागरिकांच्या अशा समस्या किंवा तक्रारी असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या संपूर्ण आंदोलनाचे आयोजन अजय मेश्राम (जिल्हा सचिव, भंडारा जिल्हा) यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडले.

