अन्नत्याग आंदोलन मोझरी (अमरावती) येथे भंडारा जिल्हाध्यक्ष रविभाऊ मने यांनी घेतली भेट
भंडारा जिल्हा वार्ता:-13 जून 2025 ला अन्नत्याग आंदोलन मोझरी (अमरावती) येथे मा. बच्चु भाऊ कडू साहेब यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस सुरु आहे.
श्री रवीभाऊ मने भंडारा जिल्हा अध्यक्ष, व शेषराव र. गणवीर तुमसर तालुका प्रमुख यांनी बच्चुभाऊ कडू साहेब यांची प्रत्येक्ष भेट घेतली व तब्बेती बाबत विचारपूस केली व रवीभाऊ मने साहेब यांनी म्हणाले की, आम्ही तुमच्या सबोत नेहमी राहू व शासनाने आमच्या एकूण 17 मागण्या मान्य कराव्या असे प्रतिपादन केले. त्यामंध्ये दिव्यांग बांधवांना मासिक 6000 मानधन देण्यात यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व इतर एकुण 17 मागण्या घेऊन बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाला अनेक संघटनांनी पांठीबा दिला आहे. बच्चु भाऊंनी ठाम निर्धार केला आहे की, जो पर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.
बच्चु भाऊंनी सर्व दिंव्याग बांधव, शेतकरी यांना आव्हान केले की त्यांनी आपल्या भविष्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे.
