अवैध डीझेल वाहतूक करणारा वाहन पोलीसांच्या ताब्यात…
खापा चौ रस्त्यावर कार्यवाही.
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या गोबरवाही पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंद्यांना गय नाही अशी छाप ठाणेदार शरद शेवाळे यांनी सोडली आहे.
पोलीस निरीक्षक शरद शेवाळे अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी ॲक्सन मोडमध्ये आलेले आहेत .
पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना मौजा खापा चौ रस्त्यावर एक ब्लोरो गाडी क्र. MP- 50 T 0240 ह्या गाडी मध्ये अवैध रितीने डीझेल वाहतूक करतांना आढळले. गाडी चालक 1) मनीष कमरे रा. गोरेघाट मध्यप्रदेश 2) गाडी मालक लंकेश कोरडे रा. गोरेघाट मध्यप्रदेश हे चारचाकी ब्लोरो मध्ये प्लास्टिक कॅन मध्ये 14 वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅन मध्ये एकुण 504 लिटर डीझेल प्रती 85रु. लिटर प्रमाणे 42,800/-रु.व ब्लोरो गाडी ची किंमत 5 लाख असा एकुण 5 लाख 42,840 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.
सदर मालाची विचारपुस केली असता त्यांच्या कडे गाडीत कोणतेही कागदपत्रे डिझेल वाहतूक करत असताना न मिळुन आल्याने आरोपींना अत्यावश्यक वस्तू अधि.1955, कलम 3.7 प्रमाणे गुन्हा नोंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, पोहवा राघोर्ते करत आहेत.



