शालेय

प्रशिक लांडगे ची गरूडभरारी

तुमसर वार्ता:-
जिल्हा परिषद हायस्कूल नाकाडोंगरी येथील इ.10 मधील विद्यार्थी प्रशिक नानाजी लांडगे याने इ.10 वी मार्च 2025 च्या परीक्षेमध्ये 92% गुण घेऊन नाकाडोंगरी केंद्रामधून व शाळेमधून प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे.प्रशिक सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी होता.त्याची परिस्थिती अत्यंत गरीब व हलाखीची असल्याने त्याने आपले संपूर्ण शिक्षण आपली आजी श्रीमती विनोदाताई गजभिये यांच्या घरी राहून पूर्ण केले.

प्रशिकला शिकविण्यासाठी विनोदाताईंनी खूप परिश्रम घेतले. प्रशिकला डॉक्टर बनविण्याचे तिचे स्वप्न आहे.
प्रशिकने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्री के.एस.इनमुलवार यांना दिलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button