शालेय
जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रशिक ने मारली बाजी…

जिल्हा परिषद हायस्कूल नाकाडोंगरी एस. एस. सी. निकाल 91.66%
तुमसर (शिक्षण वार्ता) :-भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल विद्यालय नाकाडोंगरी येथील दहावी मेट्रिक परिक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये प्रशिक नानाजी लांडगे याने 92% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि नाकाडोंगरी परिसरात नावलौकिक मिळवला. तसेच रोशन संजय शेंद्रे 89.20% घेऊन दुसरा नंबर पटकावला. तसेच राज आनंद निकुळे 82%, साक्षी संदिप शेन्द्रे 80.20% , गौरी देविचंद कोलते 76,80% असे गुण मिळवून नाकाडोंगरी जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा नाव गौरवण्यीत केले तसेच शाळेतील मुख्याध्यापक ईनमुलवार सर व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

