तुमसर मनसे ची शहर कार्यकारणी घोषित…
तुमसर वार्ता:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन व भंडारा जिल्हाध्यक्ष नितीन जी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात आणि तुमसर शहर अध्यक्ष निखिल कटारे व उप शहर अध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर यांच्या नियुक्ती पत्राद्वारे आज दिनांक ३०-०४-२०२५ ला आमंत्रण लॉन येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष स्वप्निल बुराडे,तालुका सचिव दीपक सराटे,तालुका संघटक रोशन ढोके,व नवनियुक्त पदाधिकारी.शहर सचिव सागर भुरे,शहर संघटकअश्विन देशमुख, शहर सचिव आशिष सहारे, विभाग अध्यक्ष रवींद्र महाकाळकर, शाखा अध्यक्ष विजेंद्र महाकाळकर, शाखा अध्यक्ष भिवगडे जी,यांच्यामुळे पक्षांमध्ये चांगली संघटना वाढेल या सर्व बाबींचा विचार लक्षात घेऊन त्यांना विविध पदा ची जबाबदारी देण्यात आली/नियुक्त करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती चालणारा हा पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा बोट धरून चालणारा हा पक्ष आहे म्हणून आम्ही या पक्षांमध्ये आलो याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे असे नवनियुक्त शहर संघटक अश्विन देशमुख व सचिव सागर भुरे यांनी मार्गदर्शन केले.आणि शहर अध्यक्ष कटारे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्याव शहर उपाध्यक्ष त्रिभुवनकर व तालुका उपाध्यक्ष बुराडे यांनी पक्षाच्या भगवा दुपट्टा त्यांना ओढून त्यांच्या सत्कार केला.यावेळी सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

